कोलकाता : बंगालमधील मतदानाच्या आठ टप्प्यांनंतर आता प्रतिक्षा आहे ती 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पक्षाचे सर्व उमेदवार आणि पोलिंग एजंट यांच्यासमवेत बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीत टीएमसी पुन्हा सरकार स्थापन करेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होईल. असा दावा त्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जी यांनी आपल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांना आणि पोलिंग एजंट यांनी कोणीही दिलेलं जेवण आणि सिगरेट न घेण्याचा सल्ला दिला आहे. टीएमसी बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजपला त्यांचे आमदार खरेदी करायचे आहेत. ममता यांनी सर्व पक्षाच्या उमेदवारांना भीती वा प्रलोभनासमोर न झुकण्याचा आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'सर्व उमेदवारांनी मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्रातच रहावे. ते (भाजपा) कोणत्याही प्रकारे गोंधळ घालू शकतात. ईव्हीएम सोडू नका. कोणीही आपल्याला पैसे देऊन ईव्हीएम जवळून लांब करु शकतात. परंतु आपण ईव्हीएम सोडायचं नाही सकाळी मतगणना केंद्रावर जा.'


'आपला विजय निश्चित आहे. काही जागांवर भाजप अडचणी निर्माण करू शकते. याबद्दल सावध रहा. काही समस्या असल्यास टीमला कळवा.' ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, 'आपण 'बांकुडा, जलपायगुडी, कूचबिहार विशेषत: उत्तर बंगालमधील काही जागांवर मागे राहू शकतो, परंतु मनाला वाईट वाटू देऊ नका. मतमोजणी केंद्र सोडू नका. शेवटी आपण विजयी होऊ.'