कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जीची (partha chatterjee) जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी (arpita mukherjee) हिच्याबाबत ED (अंमलबजावणी संचालनालय) ने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. अर्पितावर 12 बनावट कंपन्या (Fraud Company) चालवल्याचा आरोप आहे. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्पिताला (arpita mukherjee) शनिवारी ईडीने अटक केली होती. तिच्या घरातून 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. अर्पिताच्या फ्लॅटच्या झडतीदरम्यान ईडीला अनेक कागदपत्रे सापडली आहेत. या कागदपत्रांवरून बनावट कंपन्या चालवत असल्याचा खुलासा झाला आहे. ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारे नामवंत लोकही यात सामील असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या (Teacher recruitment scam) प्राथमिक तपासात पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी 12 बनावट कंपन्या चालवत असल्याचे समोर आले आहे. जोका येथील अर्पिता मुखर्जीच्या घरावर शनिवारी 23 जुलै रोजी सायंकाळी छापा टाकून या कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारे नामवंत लोकही यात सामील असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून ती या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आमच्याकडे अशा 12 कंपन्यांची कागदपत्रे आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला ओडिशा आणि तामिळनाडूमधील काही लोकांचाही संगनमत सापडला आहे. या लोकांच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाली आहे. आम्ही या लोकांवर लक्ष ठेवून आहोत. हे देखील लवकरच स्कॅनरच्या कक्षेत आणले जातील.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमधील लोकांची मिलीभगत लक्षात घेऊन आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की, अर्पिता मुखर्जीने कोणत्या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये गुंतवणूक केली आहे का? आमच्याकडे अनेक दस्तऐवज, फाइल्स आणि स्वाक्षरी केलेले कागदपत्रे याकडे निर्देश करतात.