Fish Tea Recipe Video Viral: देशभरात चहाप्रेमींची संख्या अधिक आहे. भारतातील अनेक नागरिकांची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्यानंतरच त्याचा दिवस सुरू होतो. चहाचा स्वाद आणि सुंगधही अनेकांना फ्रेश करुन जातो. भारतीय नागरिकांची चहाची ही आवड लक्षात घेऊन अनेक ठिकाणी चहाचे कॅफे सुरू झाले आहेत. या ठिकाणी मसाला, वेलचीपासून ते चॉकलेट फ्लेव्हरपर्यंतचे चहा मिळतात. मात्र, खऱ्या चहाची चवही टपरीवरील चहालाच येते. सध्या सोशल मीडियावर चहाशीसंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक महिला चहा बनवत असतानाच त्यात मच्छि टाकते. चहाचा हा अनोखा आणि आगळा-वेगळा फ्लेव्हर पाहून नेटकऱ्यांनी तर डोकंच फोडून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमधील हा व्हिडीओ असून यावर अनेकांनी टीका केली आहे. अलीकडे सोशल मीडियाच्या जमान्यात फुड व्लॉगरची संख्याही वाढत आहे. अशावेळी वेगवेगळ्या व हटके डिशेस व त्याची स्पेशालिटी समोर आणण्याचा ते प्रयत्न करतात. एका महिलेनेही चहासोबत असाच एक प्रयोग केला आहे. हा व्हिडिओवर काही क्षणातच हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. नक्की काय आहे या व्हिडिओत पाहूयात. 


व्हारयल झालेल्या व्हिडिओत, महिला सगळ्यात पहिल्या एका भांड्यात चहा बनवताना दिसत आहे. चहा उकळत असताना अचानक ती महिला त्यात मच्छिचा तुकडा टाकताना दिसत आहे. त्यानंतर चहाला उकळी येईपर्यंत ती त्यात मच्छि शिजवताना दिसत आहे. चहा उकळल्यानंतर ती कपात तो चहा ओतत आहे. चहा कपात ओकल्यानंतर त्यात एक स्टिक ठेवून चहात उकळलेल्या मच्छिचा तुकडा लावून सजवण्यात आलं आहे. 



हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमचा चहा पिण्याचाच मूड बिघडू शकतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर हा व्हिडीओ  @price_trader_  नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत 43 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर, शेकडो लोकांनी त्या व्हिडिओला लाइक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे. तर, एका युजरने म्हटलं आहे की चहाप्रेमी कुठे आहेत.  तर, काहींनी म्हटलं आहे की मी आजपासून चहा पिणे सोडलं आहे. तर, एकाने मजेशीर कमेंट करत लिहलं आहे की गरुड पुराणात याच्यासाठी वेगळी शिक्षा देण्यात येईल.