Bengaluru Crime : कर्नाटकच्या बंगळुरुमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या जोडप्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेचा आरोप आहे की तिच्या शेजारच्या जोडप्याने खिडकी उघडी ठेवून लैंगिक संबंध ठेवतात. यामुळे वाद इतका वाढला की हे प्रकरण वादापर्यंत पोहोचले आणि आता दोन्ही बाजूच्या तक्रारी घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश याबाबत निर्णय देणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

44 वर्षीय महिलेने तिच्या शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार देखील केली. महिलेना आरोप लावला, की तिच्या शेजारी राहणारे जोडपं त्यांची खिडकी उघडी ठेवून त्यांच्या खासगी क्षणांचा आनंद घेत असतात. या जोडप्याने त्यांची खिडकी उघडी ठेवली होती आणि माझी तिथे नजर पडली तेव्हा ते शारिरीक संबंध ठेवत होते. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.


हा सगळा प्रकार दक्षिण बंगळुरुच्या गीरिनगर भागातील अवलहल्ली परिसरात घडला. तक्रारदार महिलेच्या शेजारी आणखी एक घर आहे ज्याची खिडकी महिलेच्या घराच्या दिशेने उघडते. काही दिवसांपूर्वी एक नवविवाहित जोडपे शेजारच्या या घरात भाड्याने राहायला आले आहे. हे नवविवाहित शेजारी जोडपे त्यांच्या बेडरुमची खिडकी उघडी ठेवत. मात्र शारिरीक संबंध ठेवताना ते खिडकी बंद करत नव्हते. उघड्या खिडकीमुळे जोडप्याच्या घराचा आतील भाग स्पष्ट दिसत असल्याने शारिरीक संबंध ठेवताना महिलेची नजर अनेकदा त्यांच्यावर पडत असे. त्यामुळे महिलेने पोलिसांना शेजारच्या जोडप्यावर कारवाई करण्यास सांगितले.


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तक्रारदार महिलेने आरोप केला की या जोडप्याने त्यांच्या शारिरीक संबंधादरम्यान जाणूनबुजून त्यांची खिडकी उघडी ठेवली होती. खिडक्या बंद करण्यास सांगितले तेव्हा त्याने चुकीचे हावभाव केल्याचा दावाही महिलेने केला. महिलेने पुढे सांगितले की, शेजाऱ्याने माझ्यावर बलात्कार करून खून करण्याची धमकी दिली आणि माझ्या कुटुंबीयांशी गैरवर्तन केले.


दरम्यान, शेजाऱ्यांमुळे माझ्या घरातील शांतता भंग पावली असल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली. महिलेने शेजारी, घरमालक आणि घरमालकाच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम 504, 506, 509 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दुसरीकडे या जोडप्याच्या घरमालकाच्या पत्नीने महिलेविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे. घरमालकाच्या पत्नीने आरोप केला की, महिलेला आमच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंना हाकलून लावायचे होते, त्यामुळेच ती असे आरोप लावत आहे.