बंगलुरुमध्ये 29 वर्षीय महिला जिचं नाव महालक्ष्मी असं होतं. तिची हत्या करुन शरीराचे 59 तुकडे तिच्याच फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. या प्रकरणातील आरोपी मुक्तिरंजनने गुरुवारी आत्महत्या केली आहे. या घटनेला दिवसेंदिवस वेगळं वळण मिळत आहे. या घटनेतील आरोपीने आत्महत्या करुन सुसाईड नोट लिहिली आहे. एवढंच नव्हे तर आता आरोपीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, महालक्ष्मी आरोपीला शारीरिक आणि मानसिकरित्या त्रास देत होती. ब्लॅकमेल करत होती. 


ब्लॅकमेल करायची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, महिला आरोपी मुक्ती रंजन यांच्याकडे सतत पैसे आणि मौल्यवान वस्तूंची मागणी करत होती. तसेच महालक्ष्मीने त्याचा शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. भद्रक येथील स्मशानभूमीत मंगळवारी रात्री मुक्ती रंजन यांचा मृतदेह आढळून आला. आरोपीने 3 सप्टेंबर रोजी महिलेची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते.


हत्येनंतर आरोपी ओडिशात फरार


बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या महालक्ष्मी या महिलेच्या हत्येनंतर आरोपी त्याच्या गावी पळून गेला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गेल्या 9-10 दिवसांपासून ओडिशामध्ये त्याच्या भावासोबत राहत होता. त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुलीही आपल्या भावाकडे दिली होती. मुक्ती रंजनाच्या भावाने सांगितले की, महालक्ष्मी माझ्या भावाकडून जबरदस्तीने पैसे आणि दागिने घेत असे. आरोपीने तिला एक महागडा फोन आणि सोन्याची अंगठी दिली होती, मात्र तरीही महालक्ष्मी त्याला धमकावत राहिली.


आरोपीला मारहाण 


मारेकऱ्याच्या भावाने सांगितले की, महालक्ष्मीच्या अत्याचारामुळे नाराज झालेल्या भावाने तिची हत्या केली. आरोपीने आपल्या भावाला सांगितले होते की, महालक्ष्मी सतत पैशाची मागणी करत असे आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत ​​असे. मुक्ती रंजनच्या भावाने सांगितले की, एकदा महालक्ष्मीने त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला आणि यामुळे लोकांनी त्याला मारहाण देखील केली आणि पोलिसांनी त्याला अटकही केली. या आरोपांनंतर माझा भाऊ मानसिक तणावाखाली होता आणि त्याने महालक्ष्मीची हत्या करण्याचा निर्णय घेतला.


मुक्ती रंजनची सुसाईड नोट सापडली


पोलिसांना आरोपीच्या डायरीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये मुक्ती रंजन यांनी महालक्ष्मीच्या वागण्याला कंटाळल्याचे लिहिले होते. महालक्ष्मीला मारल्यानंतर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले की, मुक्ती रंजनने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती पण तसे करता आले नाही.


आरोपीच्या भावाचा दावा


आरोपीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की बेंगळुरू पोलिसांनी मुक्ती रंजनच्या भावाकडून जबरदस्तीने माहिती काढण्यासाठी अत्याचार केला. मुक्ती रंजनच्या भावाने सांगितले की, हिंदी न समजल्यामुळे त्याला आणखी अडचणींचा सामना करावा लागला. त्याला अनेक ठिकाणी नेऊन शेवटी भुवनेश्वरमध्ये सोडण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईवर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.