Viral Video : सोशल मीडियावर (Socia Media) सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. दुचाकीस्वार एका वृद्धाला फरफटत नेत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा थरार कैद केला आहे. कर्नाटकमधील (Karnataka) ही घटना आहे. टाटा सूमो आणि दुचाकीस्वाराची टक्कर झाली. त्यानतंर या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद हाणमारीपर्यंत आल्यावर दुचाकीस्वार तिथून पळाला, पण टाटा सूमो चालकाने दुचाकी मागून पकडण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकीस्वाराने त्याच अवस्थेत त्याला फरफटत नेलं. बऱ्याच अंतरापर्यंत दुचाकीस्वाराने या वृद्धाला फरफटत नेल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने रिक्षा आडवी घालत दुचाकीस्वाराला अडवलं. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


ही घटना कर्नाटकमधल्या बंगळुरु इतल्या मागदी रोडवर घडली. दुचाकीस्वाराना टाटा सूमो कारला धडक दिली. याचा जाब विचारण्यासाठी टाटा सूमोचा चालक खाली उतरला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. पण दुचाकीस्वार पळून जाऊ लागला. त्याला थांबवताना टाटा सूमो चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार त्याला फरफटत घेऊन गेला. पण वृद्धीने दुचाकी सोडली नाही. दरम्यान, रस्तावरुन प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांनी आवाज देत त्या दुचाकीस्वाराला थांबण्याचं आवाहन केलं. पण त्या तरुणाने त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं.



या घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झाली असूनत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या तरुणालाही लोकांनी चांगलाच चोप दिला त्यानंतरत्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांनी या दुचाकीस्वार तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाविरुद्ध गोविंदराज नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.