Bengaluru Woman Police Shocked: बंगळुरुमधील पोलिसांनी एका 29 वर्षीय तरुणीला अगदीच विचित्र प्रकरणात अटक केली आहे. या तरुणीने एका अपघाताचा कट रचत त्या माध्यमातून मोबाईलची चोरी केल्याचं समोर आलं आहे. बंगळुरुमधील भोगनाहल्ली परिसरात घडलेल्या या साऱ्या ठरवून केलेल्या अपघाताच्या माध्यमातून तरुणीला तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचा म्हणजेच एक्स बॉयफ्रेण्डचा मोबाईल आपल्या ताब्यात घ्यायचा होता अशी माहिती उघड झाली आहे. 


कोण आहे ही तरुणी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचं नाव पी. श्रृती असं असून तिला या कटामध्ये मदत करणाऱ्या मनोज कुमार, सुरेश कुमार, होनाप्पा आणि व्यंकटेश या चार तरुणांना शनिवारी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अटकेनंतर या 29 वर्षीय तरुणीने, पूर्वा श्रमीच्या प्रियकराकडून त्याचा मोबाईल मिळवण्यासाठी आपण हा कट रचला होता अशी कबुली दिली आहे. या मोबाईलमध्ये आमचे काही खासगी फोटो (Intimate Photos) असल्याने आपल्याला हा मोबाईल हवा होता, अशी कबुली मुलीने दिल्याचं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे. 


आधी ही चोरीच वाटली


सुरुवातीला पोलिसांना अपघातानंतर चोरी झाली असं वाटतं होतं. श्रृती आणि तिचा मित्र बाईकवरुन फिरत असताना एक कार त्यांच्या बाईकला धडकली. धडक दिल्यानंतर आरोपींनी बाईकस्वारांचे मोबाईल घेऊन तिथून पळ काढल्याचा दावा केला गेला. मात्र नंतर हा सारा प्रकार त्या बाईकवर बसलेल्या मुलीनेच हा कट रचल्याचं समोर आलं. या मुलीनेच पैसे देऊन कारने आपला मित्र आणि एक्स बॉयफ्रेण्डच्या बाईकला धडक देण्याची सुपारी दिलेली. 


पोलिसांकडे तक्रार


या प्रकरणामध्ये ज्याचा मोबाईल चोरीला गेला त्या डुम्पा वामसी कृष्णा रेड्डीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ज्यामध्ये त्याने आपल्या बाईकला एका कारने धडक देऊन मोबाईल चोरल्याची तक्रार दाखल केली. हा सारा प्रकार 20 सप्टेंबर रोजी घडल्याचंही तक्रारदाराने सांगितलं. अपघातानंतर कारमधील व्यक्तींनी आमच्याकडून आमचे मोबाईल खेचून घेतले आणि तिथून पळ काढल्याचं सांगितलं.


पीडित काय म्हणाला?


"स्वीफ्ट डिझायर कार आमच्या बाईकला मागून धडकली. मी त्यांना जाब विचारायला गेलो. त्यावेली कारमधील दोघांनी आमचे फोन खेचले," असं पीडित तरुणीने पोलिसींकडे केलेल्या तक्रारीत सांगितलं. मात्र पोलिसांना या प्रकरणामध्ये कोणताही अपघात झाल्याचं दिसून आलं नाही. उलट त्या कारने या दोघांना बाईकवरुन जाताना आडवलं आणि त्यांचे मोबाईल खेचून घेतले. या दोघांनी धडक दिल्याचा खोटा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं.


आरोपींनी सांगितलं सत्य


पोलिसांनी कारच्या क्रमांकावरुन आरोपींचा शोध घेतला. आरोपी मनोज हा पेशाने रंगकाम करणारा कामगार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानेच श्रृतीने आम्हाला यासाठी पैसे दिल्याची कबुली पोलिसांना दिली. यासाठी श्रृतीने आम्हाला 1.1 लाख रुपये दिल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी श्रृतीलाही ताब्यात घेतलं.


कबुलीत काय म्हणाली?


माझं या तरुणाबरोबर ब्रेकअप झालं होतं. मात्र माझ्ये काही खासगी फोटो त्याच्याकडे असल्याने मला कायम असुरक्षित वाटायचं. म्हणूनच मी फोन चोरण्यासाठी हा बनाव रचल्याचं श्रृतीने पोलिसांना सांगितलं. तो माझ्या खासगी फोटोंचा भविष्यात गैरवापर करेल अशी मला भीती वाडत होती. मात्र आपण आधीच सर्व खासगी फोटो डिलीट केल्याचं त्याने श्रृतीला सांगितलं होतं. तरीही तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता. त्यातूनच तिच्या घरी रंगकाम करणाऱ्या मनोजच्या मदतीने तिने हा कट रचून मोबाईल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं.