छोटा फंड बडा धमाका! या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक होतेय तिप्पट; वाचा सविस्तर
फंड हाऊस स्मॉल कॅप फंडच्या माध्यमातून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा मिडकॅपच्या तुलनेत ही कॅटेगरी थोडी रिस्की आहे परंतु योग्य स्किममध्ये पैसे गुंतवल्यास मिळतो शानदार रिटर्न
मुंबई : इक्विटी म्युचुअल फंडमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कॅटगिरीमध्ये स्मॉलकॅप फंडसुद्धा सामिल आहे. फंड हाऊस इन स्किमच्या अंतर्गत कमी भांडवली कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा मिडकॅपच्या तुलनेत ही कॅटेगिरी थोडी रिस्की असते. योग्य स्किममध्ये पैसा गुंतवल्यास शानदार रिटर्न मिळू शकतो. बाजारात असे काही म्युचुअल फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 5 वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट केला आहे. SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांनाही शानदार रिटर्न मिळाला आहे.
SBI Small cap fund
एसबीआय स्मॉल कॅप फंडने 5 वर्षात 24 टक्के सीएजीआर रिटर्न दिला आहे. म्हणजेच 1 लाखाचे 3 लाख झाले आहेत तर 5 हजार रुपये मासिक गुंतवणूकीची (SIP) वॅल्यू आता 6 लाख रुपये झाली आहे.
Nippon India Small Cap Fund
या फंडने देखील 5 वर्षात पैसा जवळपास तिप्पट केला आहे. 1 लाखाची वॅल्यू 2.89 लाख झाली असून 5 वर्षाचा रिटर्न 23.5 टक्के सीएजीआर आहे. तसेच 5 हजार रुपये मासिक गुंतवणूकीची वॅल्यू 6.24 लाख रुपये झाली आहे.
Axis Small Cap Fund
एक्सिस स्मॉल कॅप फंडमध्ये 5 वर्षात 23 टक्के सीएजीआरप्रमाणे रिटर्न मिळाला आहे. या फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांचे 5 वर्षात 2.85 लाख झाले आहेत. 5 हजाराच्या मासिक गुंतवणूकीची वॅल्यू आज 6 लाखाहून अधिक झाली आहे.
Kotak Small Cap Fund
या फंडने 5 वर्षात 22.5 टक्के सीएजीआर रिटर्न दिला आहे. 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचे आज 2.75 लाख झाले आहेत. तर 5 हजार रुपये मासिक गुंतवणूकीची आजची वॅल्यू 6.5 लाख झाली आहे.
HDFC Small Cap Fund
या फंडने 5 वर्षात 21 टक्के सीएजीआर रिटर्न दिला असून 1 लाख रुपयांची गुंतवणूक 5.56 लाख इतकी झाली आहे. 5 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक (SIP)ची वॅल्यू आज 5.5 लाख रुपये झाली आहे.