मुंबई : जर तुम्ही कोणत्या चांगल्या बिझनेसच्या शोधात असाल तर, आम्ही तुम्हाला जबरदस्त कल्पना सूचवणार आहोत. Fly Ash Bricks च्या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज काल घर आणि इमारती निर्माण करण्यासाठी लाल विटांऐवजी थर्मल पावर प्लांटच्या कोळश्याच्या राखेपासून बनवणारी विट वापरली जाऊ लागली आहे. या विटांचा वापर शहरेच नाही तर ग्रामीण भागातही सुरू झाला आहे. तुमच्याकडे मोकळी जमीन असेल तर तुम्ही देखील या विटांचा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता. या बिझनेससाठी मुद्रा योजनेतूनही कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.


खादी आणि ग्रामोद्योग आय़ोग (KVIC)च्या रिपोर्टमध्ये राखेतून विट बनवण्याच्या उद्योगाचा पूर्ण लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार Fly Ash Bricks चा स्टार्टअप  करण्यासाठी 20.30 लाख रुपये खर्च येतो. बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. त्याशिवाय मुद्रा लोनची देखील मदत मिळू शकते.


राख कुठे मिळेल.
हा बिझनेस सुर कऱण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात पावर प्लांटमधून निघालेल्या राखेची गरज असते. ऊर्जा मंत्रालयाने यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मंत्रालयाच्या निर्देशानुसार पावर प्लांट पारदर्शी पद्धतीने राखेचा लिलाव करतील. जर लिलावानंतरही राख उरली असेल तर मोफत राख तुम्ही घेऊन जाऊ शकता. परंतु पहिल्यांदा येणाऱ्याला पहिले प्राधान्य अशा आधारावर ही राख देण्यात येईल.


KVIC प्रोजेक्टनुसार 5 लाख विटा 40 लाखात विकता येतील. सर्व खर्च जाऊन 5 लाखापर्यंतचा नफा तुम्हाला नक्की होऊ शकतो.