मुंबई : कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड कमी जोखीमेत जास्त परतावा देणारा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड तुमचा पैसा वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवतात.यामुळे तुमचा पोर्टफोलिओ डाइवर्सिफायइड होतो. मार्केटमध्ये अशा अनेक म्युच्युअल फंड स्किम्स आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना कंपाउंडिंग कोटक म्युच्युअल फंडची लार्ज कॅप स्किम Kotak Bluechip Fund.या स्किमने 20 वर्षात 21 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तसेच 10 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठीदेखील फंडने चांगला रिटर्न दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 वर्षांचा रिटर्न 
कोटक ब्लुचिप फंडने 15 वर्षात 13 टक्के CAGRच्या दराने रिटर्न दिला आहे. या फंडमध्ये जर गुंतवणूकदाराने 50 हजार रुपये गुंतवले असते तर 15 वर्षांनी ही रक्कम 3.10 लाख रुपये झाली असती. तसेच 5 हजार रुपयांची 15 वर्षांची एसआयपीची वॅल्यू 28 लाख झाली असती.


20 वर्षाचा रिटर्न
या फंडने 21 टक्क्यांच्या CAGRच्या दराने रिटर्न दिला आहे. फंडमध्ये 50 हजार रुपयांच्या गुंतवणूकीची वॅल्यू 20 वर्षानंतर 21 लाख रुपये झाली असती. तसेच 5 हजार रुपयांची 15 वर्षांची एसआयपीची वॅल्यू 90 लाख रुपये झाली असती. 


कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक
कोटक ब्लुचिप फंड मुख्यतः लार्ज कॅप  शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या शेअरमध्ये HDFC BANK, ICICI BANK, INFY, TCS, HINDUSTAN UNILEVER,L&T, HDFC, AXIS BANK आणि भारती एअरटेल सामिल आहे.