SIP साठी 5 बेस्ट मल्टीकॅप फंड | 5 वर्षात 33 टक्क्यापर्यंत रिटर्न; तुम्ही गुंतवले का?
मार्केटच्या तेजीमध्ये सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
मुंबई : शेअर बाजारात रेकॉर्ड तेजी सुरू आहे. दरम्यान लार्ज कॅप, मिडकॅप कॅप, स्मॉल कॅप सर्वांचे व्हॅल्युएशन हाय असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही सेगमेंटमध्ये नव्याने पैसे गुंतवण्याबाबत गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. अशातच सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. SIP साठी मल्टीकॅप म्युच्युअल फंड बेस्ट असू शकतात. कारण यामध्ये तुमचा पोर्टफोलियो डायवर्सिफाइड होतो.मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांचे पैसे समान पद्धतीने लार्ज कॅप, मिडकॅप, आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवतात. मागील 5 वर्षात या सर्वात जास्त रिटर्न देणाऱ्या एसआयपीबद्दल जाणून घेऊ या...
Quant Active Fund
Quant Active Fund मध्ये SIP करणाऱ्याना 5 वर्षात 33 टक्के रिटर्न मिळाला आहे. 5 हजार रुपयांच्या मासिक SIP ची वॅल्यु 6.65 लाख रुपये झाली आहे. तसेच 1 लाख एकत्र गुंतवणूकीची वॅल्यु आज 3 लाख झाली आहे. कमीत कमी 1000 रुपयांपासून SIP सुरू करता येते. फंडमध्ये एकूण एसेट्स 31 ऑगस्ट रोजी 1051 कोटी रुपये होते. एक्सपेंस रेशो 0.50 टक्के आहे.
Baroda Multi cap Fund
बडोदा मल्टीकॅप फंडमध्ये एसआयपी करणाऱ्यांना 5 वर्षात 22 टक्के रिटर्न मिळाला आहे. 5000 रुपयांच्या मासिक SIPची वॅल्यु येथे 5.15 लाख रुपये झाली आहे. तसेच 1 लाख एकत्र गुंतवल्यास त्या गुंतवणूकीची वॅल्यु 5.15 लाख झाली आहे. मिनिमम 500 रुपयांपासून SIP सुरू करता येते. फंडचा एकत्रित एसेट्स 31 ऑगस्ट 2021 पर्यंत 1116 कोटी रुपये आहे आणि एक्सपेंस रेशो 1.52 टक्के आहे.
Invesco India Multicap Fund
Invesco India Multicap Fund मध्ये 5 वर्षात SIP ने 22 टक्के रिटर्न दिला आहे. 5 हजार रुपये मंथली SIPची वॅल्यु येथे 5.13 लाख रुपये झाली आहे. 1 लाख एकत्र गुंतवणूक केल्यास पाच वर्षात 2.16 लाख रुपये झाले असते. कमीत कमी 500 रुपयांपासून ही SIP सुरू करता येते.
Principal Multi Cap Growth Fund
या SIP ने गेल्या 5 वर्षात 21.5 टक्के रिटर्न दिले आहे. 5 हजाराच्या मासिक SIPची वॅल्यु आज 5.06 लाख झाली आहे. कमीत कमी 100 रुपयांपासूनही SIP सुरू करता येते.
BNP Paribas Multi Cap Fund
या SIP मध्ये 5 वर्षात 21.20 टक्के रिटर्न मिळाला आहे. कमीत कमी 100 रुपयांपासूनही SIP सुरू करता येते.