नवी दिल्ली : इंफोसिसने नफ्याच्या बाबतीत या महिन्यातही बाजी मारली आहे. २०१८ च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा नफा ३७.६% वाढून ५१२९ कोटी रूपये झाला आहे.  २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत हा नफा ३७२९ कोटी रूपये होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या तिमाहीत इंफोसिस आय १.३% ने वाढून १७७९४ कोटी रूपये होता. दुसऱ्या तिमाहीत इंफोसिस आय १७,५६७ कोटी रुपये होती.


डॉलरमध्येही फायदा


आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा डॉलर आय १% ने वाढून २७५.५ कोटी डॉलर झाला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा डॉलर आय २७२.८ कोटी डॉलर होता. 


एबिटमध्ये काही बदल नाही


सर्व तिमाहीच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचे एबिट ४२४६ कोटी रुपये होता. हा नफा २४.२% च्या तुलनेत २४.३% झाला. 


एट्रिशन दर कमी झाला


तिमाहीच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचे स्टॅंड एलोन एट्रिशन दर १७.२% कमी होऊन १५.८% नफा झाला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने एकूण १२,६२२ नव्या नियुक्ता केल्या.