मुंबई : शेअर बाजार सध्या उच्चांकी स्तर गाठत आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा गुंतवणूकदरांना होत आहे. यादरम्यान, एका शेअरने एका वर्षात 410 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची अजूनही संधी आहे का? याबाबत जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hinduja Global Solution (HGS)  च्या या शेअरने गेल्या एका वर्षात मोठी झेप घेतली आहे. जून 2020 मध्ये कंपनीचा शेअर 666 रुपयांवर होता. जो जून 2021 मध्ये वाढून 3397.6 रुपयांवर पोहचला आहे. अशाप्रकारचे कंपनीच्या शेअरहोल्डर्सला 410 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. कोण्या गुंतवणूकदाराने गेल्यावर्षी 5 लाख गुंतवले असतील तर त्याला आज 25 लाख रुपये मिळाले असतील.


जर सध्याच्या वेळेचा विचार करता, Hinduja Global Solution (HGS) च्या शेअरमध्ये गुतंवणूक करणे हा चांगला पर्याय आहे. तज्ज्ञांनी शेअरमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या कंपनीच्या निकालांमुळे शेअर सलग काही दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये आहेत.


जून 2021 च्या तिमाही निकालांमध्ये कंपनीला 117 कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा 50 कोटींनी वाढला आहे.