मुंबई : शेअर बाजारात पैसा लावण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे संबधित कंपनीवर रिसर्च करणे. जर तुम्ही पैसे गुंतवण्याआधी कंपनीचा अभ्यास केला नसेल तर, तुम्ही कायम गोंधळात राहू शकता. त्यामुळे मेहनतीने कमावलेले पैसे योग्य शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी त्या कंपनी / शेअर्सवर सविस्तर अभ्यास असायला हवा. आज आम्ही तुम्हाला रिसर्च करून योग्य शेअर सुचवणार आहोत. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज EID Parry या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. संदीप जैन यांनी या कंपनीच्या काही विशेष बाबी नमूद केल्या आहेत. 


ही मुरूगप्पा ग्रुपची कंपनी आहे. भारताच्या प्रमुख व्यापारिक समुहापैकी एक आहे. या ग्रुपने कोरोमंडल फर्टिलाइजरमध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे ही 225 वर्ष जूनी कंपनी आहे. मार्केट एक्सपर्ट कंपनीबाबतीत बुलिश आहेत. EID Parry म्हणजेच East India Distilleries Parry Limitedचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे.  या शेअरसाठी जैन यांनी 520 ते 525 रुपयांपर्यंतचे टार्गेट दिले आहे.


शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी चांगला स्टॉक
हा एक शुगर स्टॉक आहे. सध्या बाजारात साखर क्षेत्रात काहीतरी मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुगर स्टॉकवर अनेकांचे लक्ष लागले आहे. जैन यांनी म्हटले की, EID Parry, द्वारिकेश शुगर, कोठारी शुगर, बलरामपूर शुगर आणि रेणुका शुगर्ससुद्धा गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगले स्टॉक आहेत.