दीराच्या लग्नात वहिनीचा बोलबाला, तिने असं काय केलं ज्यामुळे नातेवाईक पाहतच राहिले
दीराच्या लग्नात वहिनीने घातलेला धुमाकूळ सोशल मीडियावर चर्चेत, व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र धुमाकूळ
मुंबई : लग्न म्हटलं तर डान्स हवाचं. डान्सशिवाय प्रत्येक लग्न अपूर राहत असं म्हणायला हरकत नाही. सध्या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नात डान्स नसेल, तर त्या लग्नाला काही धमाल नसते. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर वहिनी एकटीच थिरकताना दिसत आहे.
दीरच्या लग्नातील वहिनीचा भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वहिनीचा डान्स पाहून जमलेले सगळे थक्क झाले.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या व्हिडीओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसतात.
व्हिडीओमध्ये वहिनी 'लो चली मैं...' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.