दीराच्या लग्नात वहिनीने घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र चर्चा
दीराच्या लग्नात वहिनीने घातलेला धुमाकूळ पाहून नातेवाईकही झाले आश्चर्यचकित, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सध्या भारतात लग्न सराई सुरू आहे. अशात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण दीर आणि वहिनींच्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, वहिनी दीराच्या पत्नीचं कुटुंबात जंगी स्वागत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वहिनी बॉलिवूडच्या 'लो चली मैं, अपनी देवर की बारात लेके...' गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
यावेळी स्टेजवर उपस्थित नातेवाइकांनी 500-500 च्या नोटाही वहिनी आणि दीरावर उडवल्या. बॉलीवूडच्या गाण्यांवर वहिनीसह दीर आणि नव्या नवरीने देखील जबरदस्त डान्स केला.
वहिनी आणि दीराचा व्हायरल व्हिडिओ आशिष मित्तल नावाच्या यूट्यूब चॅनलने अपलोड केला असून आतापर्यंत 28 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.