आग्रा : आग्रा जिल्ह्यातील एतमाद-उद-दौला पोलिस ठाण्यातील परिसरात रविवारी एक विचित्र प्रकरण समोर आले. या प्रकरणार असे समोर आले की, एक महिला आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या दिराच्या प्रेमात पडली आहे. ज्यामुळे तिला तिच्या नवऱ्याला सोडायचे होते. इथपर्यंत सगळं ठिक आहे परंतु यामध्ये आश्चर्य करण्यासारखी गोष्ट अशी की, या नवऱ्याने बायकोला सोडण्याचे मान्य तर केले. परंतु त्याने बायको समोर दोन विचित्र अटी ठेवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायकोला सोडण्यासाठी त्याने पहिली अट ही ठेवली की, ती त्याला सोडून जाऊ शकते, परंतु तो तिला घटस्फोट देणार नाही. त्याची दुसरी अट अशी होती की, त्याची बायको कधीही त्याच्या घरी परतणार नाही. त्यानंतर नवऱ्याची ही अट मान्य करुन ती महिला आपल्या दिरासोबत दुसरा संसार थाटायला निघून गेली.


शाहदरा येथील रहिवासी महिलेचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या महिलेला दोन मुलं आहेत. तर तिचा नवरा इलेक्ट्रिशियन आहे. जो ग्वाल्हेर येथे काम करतो. तर ही महिला आग्रा येथे तिच्या दिरासोबत आणि मुलासोबत राहत होती. यादरम्यान तिचं दिरासोबत प्रेम झालं.


याघटनेबाबत जेव्हा या महिलेच्या नवऱ्याला कळले, तेव्हा त्याने या नात्यावरती आक्षेप घेतला, परंतु त्याची बायको ऐकायला तयार नव्हती, ज्यामुळे अखेर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.


त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षातील लोकांना बोलावले आणि चर्चा केली. जेव्हा या प्रकरणात महिलेला विचारण्यात आले की, तिला नक्की काय हवे आहे. तेव्हा तिने सांगितले की, तिला दिरासोबतच राहायचे आहे आणि ती तिच्या मुलांनाही सोबत घेऊन जाईल. ज्यामुळे तिला नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे.


त्यानंतर पोलिसांनी जेव्हा नवर्‍याला काय हवे आहे असे विचारले. तेव्हा तो म्हणाला त्याला काही नको. तो बायकोला सोडायला तयार आहे. परंतु त्याच्या दोन अटी आहेत.


नवऱ्याने पुढे सांगितले की, एकतर तो बायकोला घटस्फोट देणार नाही. परंतु त्याची बायको त्याच्यापासून लांब जाऊ शकते आणि दुसरी गोष्ट त्याच्या बायकोने पुन्हा घरी येऊ नये. तो पुढे हे ही म्हणाला की, तो त्याच्या दोन्ही मुलांना बायकोकडेच ठेवायला तयार आहे.


यासगळ्यानंतर या महिलेनं आपली मुलं आणि दिरासोबत नवीन संसार थाटला.