मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे तुम्हच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या मुड नुसार वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहायला मिळेल. इथे तुम्हाला इतक्या नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात की, ते आपल्याला तासन तास सोशल मीडियावर थांबवून ठेवतात. म्हणून तर एखादं लहान मुल असो किंवा वृद्घ सगळेच आपल्याला तेथे ऑनलाईन पाहायला मिळतात. तसच हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे कोण कधी आणि कसं व्हायरल होईल हे आपण सांगू शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका महिलेचा आहे. या व्हीडीओमध्ये या काकूंनी असा काही डान्स केला आहे की बस्स... या पुढे तुम्हाला एकही शब्द सुचणार नाही.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आधी हातात माईक घेऊन गाणं गात आहे आणि तेवढ्यात ही महिला इतकी जोशात येते की, ती जोरजोरात उड्या मारून नाचू लागते आणि नाचताना या महिलेला कसलीच शुद्ध राहात नाही. ही महिला सर्व पुरुषांच्यामध्ये डान्स करत असते आणि त्यांच्या समोर उडी मारुन बसून नाचू लागते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या महिलेचा डान्स पाहाताना तो अगदी अश्लील वाटत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर लोक यावर भरभरुन कमेंट करत आहेत. एवढंच काय तर लोक, 'या महिलेला कोणीतरी थांबवा' असं देखील लोक म्हणत आहेत. तर काहीनी हा महिलेचा डान्स पाहून,' मी तर घाबरुन गेलो.' असं देखील म्हटलं आहे.