Bhairo Singh Rathore : भारत-पाक युद्धातील हिरोचं निधन, `बॉर्डर`मध्ये सुनील शेट्टीने साकारलेली भूमिका!
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या 1971 सालच्या युद्धातील हिरो भैरो सिंग राठौड यांचं निधन
Bhairo Singh Rathore passed away : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या 1971 सालच्या युद्धातील हिरो भैरो सिंग राठौड यांचं निधन झालं आहे. जोधपूरमधील एम्स रूग्णालयात राठौड यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सीमा सुरक्षा दलाने (BSF) त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. (Bhairo Singh Rathore passed away latest marathi news)
'बॉर्डर' चित्रपटामध्ये 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर चित्रपटामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) त्यांची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये ते शहीद झाल्याचं दाखवलं होतं. मात्र आज सोमवारी भैरो सिंग राठौड काळाच्या पडद्याआड गेले आहेत. 1987 साली ते निवृत्त झाले होते.
1971 साली भारत-पाकिस्तानमध्ये भैरो सिंग राठोर यांनी थारच्या वाळवंटामधील लोंगेवाा चौकीजवळ तैनात होते. बीएसएफच्या एका तुकडीचे नेतृत्त्व करत होते. त्यांनी 5 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या टँक रेझिमेंटच्या चिंधड्या उडवल्या होत्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भैरो सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भैरो सिंग राठौर हे कायम स्मरणात राहतील. इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी मोठं धैर्य दाखवलं. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुबियांसोबत आहे. ओम शांती.