इंदूर : दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल आता नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता महाराजांच्या सीएचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराजांवर खरंच आर्थिक संकट होतं का? हे स्पष्ट होईल. त्याचबरोबर त्यांची रिव्हॉल्व्हर, सुसाइड नोटच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.


आत्महत्येचे नेमके कारण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भय्यू महाराजांच्या आत्महत्येला कौटुंबिक कलह, मानसिक ताण, बिकट परिस्थिती ही मुख्य कारणे असल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे. २६ जणांच्या जबाबानंतर आत्महत्येस कोणीही जबाबरदार नसल्याचे पोलिस तपासणीतून समजतंय. मात्र महाराजांच्या मानसिक तणावाचे प्रमुख कारण दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहू यांच्यातील वाद असल्याचे समोर येत आहे. 'डॉ. आयुषी भय्यू महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत'


आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज


सध्या तरी कौटुंबिक तणाव हेच कारण समोर येत आहे. कारण इतर कारणांचा सबळ पुरावा मिळालेला नाही. तरी सुत्रांनुसार, महाराजांबरोबर राहणाऱ्यांनी त्यांचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज काढले होते, त्यामुळे महाराज तणावात होते.


पोलिसांना निवावी पत्र


पोलिसांना मिळालेल्या निनावी पत्रात महाराजांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात महाराजांच्या आवडी-निवडीपासून, त्यांच्या आयुषीसोबतच्या संबंधांबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. त्यात आयुषी महाराजांच्या आयुष्यावर हुकूमत गाजवत असल्याचे समोर आले आहे. पत्रात अशाही काही प्रसंगांचा उल्लेख आहे, ज्यानंतर महाराजांना सेवादारांसमोर जायलाही लाज वाटायची.


तर कारवाई करता येईल...


महाराजांच्या नीकटवर्तीयांपैकी एखाद्याने समोर येऊन पोलिसांना माहीती दिल्यास महाराजांवर तणाव वाढवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.