इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये अध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. लोकपाल बिलसाठी अन्ना जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या हातून ज्यूस घेतल्यानंतर अन्ना हजारे यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. उदय सिंह देखमुख असं त्यांचं पूर्ण नाव होतं पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये लोकं त्यांना भय्यूजी महाराज या नावाने ओळखायचे. त्याचे हजारो समर्थक आहेत. एक नजर टाकुया भय्यूजी महाराज यांच्या जीवनप्रवासावर...


गृहस्थ संत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भय्यूजी महाराज गृहस्थ जीवनात होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. ते अनेकदा ट्रॅक सूटमध्ये देखील दिसायचे. एका शेतकऱ्याप्रमाणे ते त्यांच्या शेतात काम करतांना देखील दिसायचे. कधी ते क्रिकेटचे देखील शौकीन होते. घोडेस्वार और तलवारबाजीमध्ये देखील पारंगत होते. कविता करणं देखील त्यांना आवडायचं. आपल्या तरुण वयात त्यांनी सियाराम शूटिंग-शर्टिंगसाठी त्यांनी मॉडलिंग देखील केली होती.


राजकारणात चांगले संबंध


29 एप्रिल 1968 मध्ये मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यात शुजालपूरमध्ये जन्मलेल्या भय्यूजी महाराज यांना दत्त भगवान यांचा आर्शिवाद आहे असं त्यांचं अनुयायीचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्र संत म्हणून दर्जा मिळाला होता. सूर्याची उपासना करणारे भय्यूजी महाराज यांचा राजकारणात देखील चांगला प्रभाव होता. त्यांचे सासरे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. नितीन गडकरी ते संघ प्रमुख मोहन भागवत यांच्याशी देखील त्यांचे संबंध होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


सामाजिक काम


भय्यूजी महाराज पद, पुरस्कार, शिष्य आणि मठ यांच्या विरोधात होते. देशापेक्षा कोणता अजून मोठा मठ नाही असं त्यांचं म्हणणं होतं. व्यक्तिपूजा त्यांना मान्य नव्हती. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रात त्यांचं मोठं काम होतं. सोलापूर ते पंढरपूरमध्ये राहणाऱ्या सेक्स वर्करच्या 51 मुलांना त्यांनी आपली मुलं म्हणून स्विकारलं होतं. बुलडाण्यात खामगावमध्ये आदिवाशींच्या 700 मुलांसाठी त्यांनी शाळा देखील बनवली. या शाळेच्या स्थापनेसाठी जेव्हा ते पार्धी समाजात गेले तेव्हा त्यांच्यावर दगडफेक झाली होती. पण त्यांनी हिम्मत न हारता त्य़ांचा विश्वास जिंकला. 


शिक्षण कार्य


भय्यूजी महाराज ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने चिंतीत होते. यामुळे त्यांनी गुरु दक्षिणा म्हणून झाडं लावण्याचं आवाहन देखील केलं होतं. आतापर्यंत 18 लाख झाडं त्यांनी लावली होती. आदिवासी जिल्ह्यांमध्ये देवास आणि धारमध्ये त्यांनी एक हजार तलाव बनवले होते. ते कधी नारळ, हार, शाल स्विकारत नव्हते. या सगळ्यांमध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा शिक्षणात खर्च करा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा ट्रस्ट जवळपास 10 मुलांना स्कॉलरशिप देत होता.