मुंबई : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचे निधन झाले. त्यांचे मूळ नाव उदय सिंह देशमुख होते. भय्यूजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सर्व समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भय्यू महाराजांचा आश्रम इंदूरमध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गज व्यक्ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह बड्या व्यक्ती त्यांच्या अनुयायी आहेत. त्यांच्या आश्रमात सर्वात आधी येणारे व्हीआयपी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्यानंतर राजकारण, सिनेमा आणि कॉर्पोरेट जगतातील अनेक व्यक्ती त्यांच्या आश्रमात येऊन गेल्या होत्या. 



 


यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी यांचा समावेश आहे.