Bhakari Making Tips: भाकरी करताना आपल्याला अनेकदा अनेक कठीण गोष्टींना तोंड द्यावे लागते जसे की कधी कधी पीठ मळताना चुका होतात तर कधी लाटताना, तर कधी भाजतानाही भाकऱ्या लुसलुशीत होत नाहीत. तेव्हा करायचं काय असा प्रश्न प्रयत्न गृहिणीला पडताना दिसतो. अशातच चिंता असते ती म्हणजे भाकरी करताना तुटू लागल्या तर? कधी कधी भाकरी मळताना आपण योग्य त्या गोष्टी फॉलो केल्या नाही की तर भाकरी थापताना तुटूही शकते. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की भाकरी ही मऊ, छान आणि लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्याचसोबत कोणत्या गोष्टी या फॉलो करणंही आवश्यक आहे, हे समजून घेणे आवश्यक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाकरी करताना मुळात आपलं मळलेलं पीठ हे योग्य प्रमाणात असावं तरच भाकरी लुसलुशीत आणि मऊदार होईल. प्रथम पीठ चाळून घेणं हे गरजेचे असते. परंतु तरीही जर का आपल्याला भाकऱ्या या थापताना तुटत असतील तर आपल्याला त्याची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते त्या कोणत्या हे आपण जाऊन घेणार आहोत. मुळात भाकरी ही जास्त मऊ आणि जास्त जाड ठेवू नका. 


  • बाजरीची भाकरी ही अनेकदा केल्यानंतर, म्हणजे भाजल्यानंतरही तुटू लागते. त्यातून गोल, मऊ आणि त्यातूनही लुसलुशीतही मग ती राहत नाही. अशावेळी काय करावं हे समजतं नाही. 

  • पहिलं म्हणजे पीठ बनवताना आपल्या योग्य ती काळजी घेणे हे फारच आवश्यक असते. एकतर पहिले गोष्ट म्हणजे बाजरीच्या भाकरीसाठी पीठ हे जास्त घट्ट भिजवू नका त्याचबरोबर जास्त सैलही करू नका. आपल्याला अशावेळी त्याची योग्य काळजी घेणे हे आवश्यक राहते. अगदी पोळीप्रमाणेच हे असते. पीठ जास्त चिकट किंवा ओलसर राहिले तर पोळ्या नीट फुगत नाहीत. 

  • तुम्हाला पीठ एकजीव करणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी हे पीठ जास्त वेळा मळावे. तुम्ही जितक्या जास्त वेळा हे पीठ मळालं तितकाच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भाकऱ्या सुरूवातीलाच थापताना तुटणार नाहीत. 

  • थापण्यापुर्वी भाकरीला हलकासा पिठाचा हात लावून घ्या. त्यातून भाकरी भाजताना अजिबातच घाई करू नका. थापताना कडा मजूबत ठेवा आणि हलक्या हातांनी भाकरी थापा. 

  • ज्या भागावर भाकरी थापत होतात त्याचा उलटा भाग घ्या आणि मग तो भाकरीवर भाजा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)