माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार अर्थात भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
भारतरत्न पुरस्काराने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रणब मुखर्जी हे जुलै 2012 ते जुलै 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. त्यांनी वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालया सारखे महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. 2004 ते 2012 पर्यंत काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. काँग्रेस नेत्यांनी देखील प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न देण्य़ाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं.