नवी दिल्ली : कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटेंचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला अटपूर्व जामीन मंजूर केलाय. पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद एकबोटेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाचा आदेश अजूनपर्यंत वेबसाईटवर अपलोड झाला नसल्याच्या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाकडून एकबोटेंना संरक्षण मिळालं आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे होते. दरम्यान पोलीसांच्या हातात पुणे सत्र न्यायालायाचे अटक वारंट असूनही ते एकबोटेना अटक करू शकणार नाहीत.


कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय होतं. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता. शिवाजीनगर सत्र न्यायालयानं एकबोटेंना पकडण्याचं वॉरंट जारी केलं होतं. 


तसंच पोलीस त्यांचा शोध घेतायत. कोरेगाव-भीमामध्ये १ जानेवारी २०१८ ला दोन गटात जातीय तणाव झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.