नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेचे अधिवेशन नवीन इमारतीत आयोजित केले जावे यासाठी नवीन संसद भवन ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नवीन संसद भवनात लोकसभा सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट मोठी असेल. राज्यसभेचा आकारही वाढेल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रावर नवीन संसद भवन बांधणार आहे. एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने ही डिझाईन तयार केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन भारतातील संवेदना आणि आकांक्षा अनुरुप नवे संसद भवन २०२२ मध्ये तयार केले जाईल. नवीन संसद भवन पुढील शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन बांधले जाईल, जेणेकरून भविष्यात खासदारांची संख्या वाढविण्यात अडचण होणार नाही. मंत्रालयाच्या मते, नवीन संसद इमारत सौर उर्जा प्रणालीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल. विद्यमान संसद भवनाला लागून असलेले नवीन संसद भवन अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी सुसज्ज असेल.



यामध्ये एक संविधान सभागृह आहे जो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. याव्यतिरिक्त, नवीन इमारतीत लाउंज, ग्रंथालय, अनेक समिती कक्ष, जेवणाचे क्षेत्र, पार्किंगची जागा, आरामदायक आसन असणार आहे. ही इमारत भूकंपरोधी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवीन संसद भवनचे भूमिपूजन करत आहेत.


भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी सर्व धर्मांची प्रार्थना देखील झाली.