मुंबई : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर GST पथकाने छापा टाकल्याचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील प्रसिद्ध परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून आतापर्यंत 200 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कानपूर आणि कन्नौज येथील व्यावसायिकाच्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्यानंतर त्याला काल रविवारी अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्नौजमधील जीएसटी चोरीचा आरोप असलेल्या पियुष जैन या व्यावसायिकाच्या घरावर छापे मारण्याचे काम सुरू आहे, त्याच्या घरी इतके पैसे सापडले की, अधिकारी अजूनही तेथे रोख मोजत आहेत. आज या प्रकरणातील मोठी अपडेट समोर अली आहे. एवढ्या मोठ्या रकमेमागे कोणाचा खरा चेहरा आहे हे पियुष जैन यांनी आज उघड केले आहे.


200 कोटी नक्की कोणाचे?


पियुष जैन यांनी कबूल केले आहे की त्यांच्या दोन्ही घरातून जप्त केलेली रोकड आणि मौल्यवान वस्तू दुसऱ्या कोणाचे नसून त्याचे स्वत:चे आहेत. कन्नौजमधील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून 600 किलो चंदनाचे तेल मिळाल्यानंतर आता या प्रकरणात डीआरआयही दाखल झाले आहे.


तपासात डीआरआयचा सहभाग असल्याने या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण परफ्यूम बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक मानकांची पायमल्ली झाल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. चंदनाचे तेलही बेकायदेशीरपणे वापरत असल्याची चर्चा येते होत आहेत.


आतापर्यंत काय झाले आहे?


आतापर्यंतच्या कारवाईत पियुष जैनच्या घरातून सुमारे 200 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पियुष जैनच्या कानपूरमधील घरातून 177.46 कोटी आणि कन्नौजमधून 17 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.


कन्नौजमधील पियुष जैनच्या घरी अजूनही रोख मोजणी सुरू आहे. याशिवाय कन्नौज येथील घरातून 600 किलो चंदनाचे तेलही जप्त करण्यात आले आहे.


कन्नौजमधून 23 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. कन्नौजमध्ये अजूनही छापेमारी सुरू आहे


कोण आहे पियुष जैन?


पियुष जैन हा देशातील प्रसिद्ध अत्तर (परफ्यूम) व्यापारी आहेत. आरोपींची कानपूर आणि कन्नौजमध्ये घर आहे. याशिवाय कन्नौजमध्ये परफ्युमचे कारखाने, कोल्ड स्टोरेज चेन, पेट्रोल पंप आहेत.


मुंबईत देखील पियुष जैनचे घर, मुख्य कार्यालय आणि शोरूम आहे. पियुष जैन यांच्या कंपन्याही मुंबईत नोंदणीकृत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष जैन यांच्या 40 कंपन्या आहेत. पियुष जैन यांचा परफ्युमचा व्यवसाय देशातच नाही तर परदेशातही पसरला आहे.