नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासून कोषाध्यक्षपदावर असलेल्या मोतीलाल व्होरा यांना हटवण्यात आलंय. त्यांच्या जागेवर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. राहुल गांधी अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे बदल करण्यात आले आहेत. 


राहुल गांधी यांची नवी टीम


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीडब्ल्यूसीमधील अनुभवी आणि तरुण नेत्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय. पक्ष संघटना सचिव अशोक गेहलोत यांनी याबाबत घोषणा केली आहे. सीडब्ल्यूसी २३  सदस्य, १९ स्थायी निमंत्रित आणि नऊ आमंत्रित समावेश आहे. राहुल गांधी यांनी २२  जुलै रोजी डब्ल्यूसीची पहिली बैठक झाली. सीडब्ल्यूसी सदस्य पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए के अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि मंत्री यांनी ओमेन चंडी यांना संधी देण्यात आली आहे.


तसेच माजी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरमैया, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, नेते, आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, कुमार वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना आणि गैखनगम यांचा समावेश आहे. सीडब्ल्यूसीमध्ये स्थायी सदस्यांत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम,  ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंग, आर.पी. सिंग, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील  रामचंद्र खूंटिया, अनुग्रह नारायण सिंग, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई आणि ई. चेल्लकुमार यांचा सहभाग आहे.


 काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक पातळीवर बदल


दरम्यान, याआधी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर दोन महत्वपूर्ण बदल केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदावरुन हटवण्याच आले. त्याठिकाणी रजनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विभागाचं अध्यक्षपद नदीम जावेद यांच्याकडे देण्यात आलंय. हे पद खुर्शीद अहमद सय्यद यांच्याकडे होते. रजनी पाटील यांची मागील महिन्यात राज्यसभेची मुदत संपली होती. इच्छा असतानाही काँग्रेस त्यांना राज्यसभेवर पाठवू शकले नाही. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.