दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी
सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवण्याचे निर्देश
नवी दिल्ली : कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पासून लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासून देशातील दुकानं आणि शॉपिंग मॉल उघडणार आहेत. शुक्रवारी मध्यरात्री केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिलाय. या निर्णयानुसार आजपासून म्हणजेच २५ एप्रिलपासून देशातली सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यरात्री हा निर्णय देण्यात आला. असे असले तरीही दुकानदारांना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरु ठेवण्यात आली होती. पण आता सर्व प्रकारची दुकान खुली राहणार आहेत. असे असले तरीही मॉल्स, शॉपिंग कॅम्पेल्क्स बंदच असणार आहेत.
सरकारतर्फे जारी केलेल्या आदेशानुसार दुकानांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारीच काम करु शकतील. तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
८० जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात सध्या विविध मार्गांनी या विषाणूवर मात करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. एकिकडे मुंबईत म्हणजेच देशाच्या आर्खित राजधानीत कोरोना झपाट्याने फोफावत असतानाच दुसरीकडे देशातील चित्र मात्र काहीसं दिलासा देणारं ठरत आहे.
शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या प्रतिनिधींकडून घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती सांगण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता, २३,०७७ वर पोहोचला आहे.
मागील चोवीस तासांत जवळपास १६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय देशात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर पाहिल्यास हे प्रमाण २०.५७ टक्के इतकं असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. मागील २८ दिवसांमध्ये १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.