नवी दिल्ली : तुमच्याकडे जर तुमची स्वत:ची कार असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची. कारण आता महामार्गांवरून प्रवास करताना तुम्हाला टोल टॅक्स अर्थात टोल नाक्यांवरील टोलवसुलीचा फारसा ताण घेण्याची आवश्यकता नाही. सध्या राज्य शासनाकडून खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा देत टोलटॅक्स माफीचा निर्णय घेतला गेला आहे. (Big decision taken by state Government no toll tax for personal car)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमर्शियल (commercial vehicles) वाहनांवरील टोलवसुली मात्र कायम राहणार आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महामार्हांवर आता फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जाईल. एमपीआरडीसी (MPRDC) नं यासाठीचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. कारण, हा नियम राजस्थान सरकारडून लागू करण्यात आला आहे. 


सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणी पाहता राजस्थान प्रशासनानं महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीनंतर सदर निर्णयाच्या धर्तीवर टेंडर करण्यात आलं. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, टोल ब्लॉक सुरु होणार आहेत. 


राजस्थानमध्ये घेण्यात आलेला हा निर्णय पाहता महाराष्ट्रात याच धर्तीवर कोणता निर्णय घेतला जाणार का, हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातही मागील कैक वर्षांपासून टोलवसुलीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. तेव्हा प्रशासन आता नागरिकांना दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


कोणाला नाही भरावा लागणार टोल? 
राजस्थान सरकारनं काही असे विभागही केले आहेत ज्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. सरकारी वाहनांपासून शव नेणाऱ्या वाहनांसह एकूण 25 प्रकारच्या वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या वाहनांचाही यात समावेश असेल.