मुंबई : देशातील काही मोठ्या बँकांच्या यादीत येणाऱ्या द स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये बँकेकडून ठराविक चार सेवा बंद करण्यात येणार असल्याचं कळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेच्या या निर्णयामुळे डेबिट कार्ड धारक, ऑनलाईन बँकिंग सेवा इत्यादींचा वापर करणाऱ्या खातेधारक  प्रभावित होऊ शकतात. अशाच निर्णयांमध्ये बँकेकडून रोकड काढण्याच्या आकड्यावरही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. 


३१ ऑक्टोबरनंतर क्लासिक आणि माएस्ट्रो डेबिट कार्ड धारक दर दिवशी आपल्या खात्यातून फक्त २० हजार रुपये इतकीच रोकड काढू शकणार आहेत. 


बँकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयापूर्वी खातेधारकांना दर दिवशी ४० हजार रुपयांपर्यंतची रोकड काढणं शक्य होतं. पण, आता मात्र या सेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून रोकड काढण्याचा आकडा कमी करण्यात आला आहे.



एटीएम फ्रॉड (फसवणूक)चं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहाराला आणखी प्राधान्य देण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. असं असलं तरीही सध्याच्या ऐन दिवाळीच्या मोसमातच हा निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेक खातेधारक प्रभावित होणार असल्याची चिन्हं आहेत.