Petrol Diesel Price  In India :  पेट्रोल-डिझेल वाढत्या किंमतीमुळे (petrol diesel price) वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. दर दोन दिवसाला  पेट्रोल-डिझेलच्या किंमती (petrol diesel rate) वाढत असल्याने आर्थिक बजेट कोलमडत आहे. महागाईमुळे होरपळणाऱ्या सर्वसमान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलच्या दरात (crude oil price) मोठी घसरण झाली आहे. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असते. या आधारे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर निश्चित केले जातात. यावर आकारल्या जाणाऱ्या करामुळे प्रत्येक राज्यांत पेट्रोल आणि डिझेलचेदर वेगवेगळे असतात. 


सध्या जगभरातील अनेक बड्या आणि नामांकित बँका दिवळखोरीत निघाल्या आहेत. अमेरिकेतील  सिलिकॉन व्हॅली बँकेसह (Silicon Valley Bank collapse)  क्रेडिट सुइस (Credit Suisse) यांना टाळे लागले आहे. यामुळे क्रेडिट सुइसच्या शेअर्स गडगडले आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 


बँकेक क्षेत्रात आलेल्या या आर्थिक भूकंपाचा फटका कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या क्षेत्रालाही बसला आहे. ब्लूमबर्ग कमोडिटीनुसार, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे $4 ने कमी होऊन $73.62 प्रति बॅरलवर पोहोचले आहे. ज्याचा दर प्रति बॅरल $72 च्या खाली जाण्याची शक्यता दिसत आहे.


तसेच, अमेरिकन ऑइल डब्ल्यूटीआयच्या किंमतीत 5.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत प्रति बॅरल $ 3.63 ने कमी होऊन प्रति बॅरल $ 67.70 वर आली आहे. दोन्ही कच्च्या तेलाच्या किमतींचा दर हा डिसेंबर 2021 च्या खालच्या पातळीवर आला आहे.


भारतीय  बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत 346 रुपयांनी कमी होऊन 5,637 रुपये प्रति बॅरलवर आली आहे. ट्रेडिंग सत्रात कच्च्या तेलाचा भाव 5,617 रुपयांवर गेला होता. बाजार सुरु होताना हा दर 5,968 रुपयांवर होता. क्रूड ऑईलचे दर 5,500 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. सरकार आणि तेल बाजार कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्न केल्यास इंधनाच्या किंमतीत लिटरमागे 15 रुपयांची कपात होऊ शकते.