मुंबई : सणासुदीला सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. याचं ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला कमी किंमतीत सोने खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे नेमके आजचे सोन्या-चांदीचे दर काय आहेत, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 कॅरेट सोने 50 हजार 401 रुपयांवर उघडले, जे मंगळवारच्या बंद दरापेक्षा 787 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. त्याचवेळी चांदीचा भावही 2500 रुपयांनी घसरून 51 हजार 850 रुपये किलोवर उघडला. आता शुद्ध सोने 56 हजार 254 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्च दरावरून 5853 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 


दोन वर्षांपूर्वीच्या 76008 रुपये प्रति किलोच्या उच्च दराच्या तुलनेत चांदी 24,185 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. याशिवाय 23 कॅरेट सोन्याची किंमत आता 50 हजार 199 रुपये आहे. त्याचवेळी 22 कॅरेट 46 हजार 167, तर 18 कॅरेट 37 हजार 801 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आता 29 हजार 485 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्यात जीएसटी आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नाही.


GST आणि ज्वेलर्सचा नफ्यासह दर किती? 
24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी म्हणजेच 1512 रुपये जोडल्यास त्याचा दर 51 हजार 913 रुपये होईल. त्याचबरोबर ज्वेलर्सचा नफा 10 टक्के जोडल्यानंतर सोन्याचा भाव 57 हजार 104 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 


जीएसटी जोडल्यानंतर चांदीची किंमत 53 हजार 405 रुपये प्रति किलो झाली आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे. म्हणजेच, 10 टक्के नफा घेऊन, ज्वेलर्स तुम्हाला सुमारे 58 हजार 746 रुपये देईल.


23 कॅरेट सोन्यावरही 3 टक्के जीएसटी आणि 10 टक्के नफा जोडल्यास तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 56 हजार 875 रुपये मिळतील. तर 3% GST सह 22 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 552 रुपये असेल. त्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर ज्वेलर्सचा नफाही वेगळा जोडल्यास सुमारे 52 हजार 307 रुपये होईल.


18 कॅरेट सोन्याची किंमत 3% GST सह 38 हजार 935 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. ज्वेलर्सचा 10% नफा जोडल्यास तो 42 हजार 828 रुपये होईल. आता 14 कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीसह 30 हजार 369 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. यावर 10% नफा जोडल्यास तो 33 हजार 406 रुपये होईल.


दरम्यान आता सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.