लखनौ : शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा राकेश टिकैत ( RAKESH TIKAIT ) यांची भारतीय किसान यूनियन (BKU) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे बंधू नरेश टिकैत ( NARESH TIKAIT ) यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान ( RAJESH CHOUHAN ) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीकेयूचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राजेश सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, भारतीय किसान युनियन मूळ भारतीय किसान युनियनच्या जागी स्थापन करण्यात आली आहे. 13 महिन्यांच्या आंदोलनानंतर घरी आलो तेव्हा नेते राकेश टिकैत हे राजकारणाने प्रेरित दिसले.


राजकारण करणे किंवा कोणत्याही पक्षाचे काम करणे हे आमचे काम नाही. शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच बीकेयूचे काम आहे. पण, आमचे नेते कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली आले आणि त्यांनी एका पक्षाचा प्रचार करण्याचे आदेश देत ​​असल्याचे दिसून आले, असे त्यांनी सांगितले. 


भारतीय किसान युनियन म्हणजेच बीकेयूची स्थापना चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी केली. आज त्यांची 11वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त लखनौ येथील ऊस संशोधन संस्था येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय किसान युनियनचे नाव बदलून भारतीय किसान युनियन (अराजकीय) असे करण्यात आले. 


राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन बीकेयूची (अराजकीय) स्थापन करण्यात आली आहे. असंतुष्ट शेतकरी नेत्यांचे मन वळवण्यासाठी बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारी लखनौला पोहोचले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून संघटना राजकारणाकडे जात असल्याने अनेकजण टिकैत यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.