मुझफ्फरपूर : बॉयलर भीषण स्फोटात 10 मजुरांना जागीच जीव गमवण्याची वेळ आली आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर परिसरात हा भीषण स्फोट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोकही खूप घाबरले होते. पोलिसांना या स्फोटाची माहिती देण्यात आली. आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. 



स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भीषण स्फोट झालेल्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. तर अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार बेला औद्योगिक परिसरात  कुरकुरे आणि न्यूडल्सच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.