भोपाळ : इंदूरहून अमळनेरला जाणा-या एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एसटीमध्ये 55 ते 60 प्रवासी असल्याची माहिती मिळतेय...तर अजून 20 प्रवासी बेपत्ता असल्याचं बोललं जातंय...नदीत कोसळलेली एसटी बाहेर काढण्याचं काम सुरू असून, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. हा भीषण अपघात होण्यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. बस पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला. ही बस इंदूरहून पुण्याला निघाली होती. 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. 


मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाईन नंबर दिला आहे. 022/23023940 हा हेल्पलाईन असल्याची माहिती मिळाली आहे.


चालकाचं नाव चंद्रकांत पाटील तर वाहकाचं नाव प्रकाश चौधरी असल्याची माहिती मिळाली आहे. ही बस इंदूरहून 7.30 वाजता सुटली. त्यानंतर 9.30 च्या आसपास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. 


दुसरीकडे महाराष्ट्रात अमरावतीमध्येही भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.