चेन्नई : तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण लागली. या अपघातात देशाचे पहिले chief of defence staff बिपीन रावत यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या दुर्घटनेमध्ये 11 मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह पत्नीचंही अपघाती निधन झालं आहे. 



6 वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर क्रॅशमधून बचावले होते संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत


सुलूरमधून कुन्नूरला परतत होतं हेलिकॉप्टर


CDS बिपीन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंगटन इथं एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले होते. वेलिंग्टनमध्ये लष्कराचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते.


सर्जिकल स्ट्राईकपासून उत्तरपूर्वेकडील तणावापर्यंत; पाहा कुठवर आहे CDS रावत यांचा दरारा


कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. 


Bipin Rawat: सर्जिकल स्ट्राईक ते म्यानमार स्ट्राईक, CDS रावत यांनी केलं होतं नेतृत्व


 हेलीकॉप्टर मध्ये कोण कोण होते?


जनरल बिपिन रावत, CDS, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल