मुंबई : आधीच महागाई आणि त्यामध्ये वाढणारं इंधन यामुळे सगळ्यांचे दर वाढले आहेत. पगार कमी आणि वाढणारी महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडलं आहे. गृहिणींना दिलासा देणारी एक बातमी आहे. वाढत्या महागाईत एक किंचित दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या दोन महिन्यात खाद्य तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये पाम तेलावरील लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्य तेलाचे दर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 


जुलैपर्यंत पाम तेलाच्या किमतीचे दर उतरण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतालाही होणार आहे. इंडिनेशियाने 28 एप्रिल रोजी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी लावली होती. 


23 मे रोजी पुन्हा निर्यात सुरू होणार आहे. या घोषणेनंतर ग्लोबल मार्केट 6 टक्क्यांनी खाली घसरलं आहे. रशिया-युक्रेन युद्धावेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. 


पाम तेलाचा वापर साबणापासून इंधनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये केला जातो. 60 टक्के पाम तेल भारतात आयात केलं जातं. भारत, इंडोनेशिया आणि मलेशिया पाम तेल खरेदी करतात. त्यामुळे भारतीयांना दिलासा मिळणार आहे.