नवी दिल्ली : स्टेशन आलं म्हणून उतरावं की आपला जीव मुठीत घेऊन जीव वाचवण्यासाठी पळावं हेच प्रवाशांना समजत नव्हतं. स्टेशनला ट्रेन लागताच 3 डब्यांमध्ये आगीचा भडका उडाला. आगीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या आगीत 3 डब्यांचं नुकसान झालं आहे तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये भीषण आग लागली. या आगीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता किती भयंकर ही आग दिसते आहे. आगीमुळे परिसरात मोठे धुराटे लोट दिसत होते. अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. 



सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेरठ इथे शनिवारी सकाळी सहारपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमधील एक डब्यात स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर आग लागल्याची माहिती मिळाली. 


ट्रेनच्या कोचमधील प्रवासी बाहेर पडायला लागले. आगीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. ट्रेनचे ब्रेक जाम झाल्याने ट्रेनमधून आधीच विचित्र वास यायला लागला. त्यानंतर धूर दिसायला लागला. त्यामुळे प्रवासी उतरायला लागले. मात्र त्याच दरम्यान स्फोटाचा आवाज आला आणि आग लागली.


ट्रेनच्या तीन डब्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी झाले आहेत. मात्र त्यापैकी अद्याप कोणाची प्रकृती गंभीर असल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.