मुंबई : रस्ते अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहे.



कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते.


यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.


रस्ते अपघात रोखण्यासाठी निर्णय


दरवर्षी देशात जवळपास 5 लाख रस्ते दुर्घटना होतात. त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो...ही संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.