नवी दिल्ली : SBI Insurance Cover : स्टेट बँक ऑफ इंडिया RuPay डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या सर्व जन धन खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत अपघात विमा देण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयच्या ग्राहकांना त्यांचे जन धन खाते उघडण्याचा कालावधीच्या हिशोबाने विम्याची रक्कम निश्चित होते. ज्या ग्राहकांचे खाते 28 ऑगस्ट 2018 च्या नंतर जारी करण्यात आले आहे. त्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे.


या लोकांना मिळेल फायदा
पंतप्रधान जनधन योजना ही अशी योजना आहे की, ज्याअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या कमकूवत नागरिकांचे झिरो बॅलेंन्स बँक खाते पोस्ट आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ग्राहकांना सुविधा दिल्या जातात. तसेच सध्याचे बचत खाते देखील जन धन खात्यात कनवर्ट करता येते. 


जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्डअंतर्गत मिळणारे अपघाती मृत्यू विम्याचा फायदा तेव्हा मिळेल जेव्हा विमाधारकाने अपघाताच्या तारखेच्या 90 दिवस आधी जनधन खात्यात काही आर्थिक व्यवहार केले असतील. 


क्लेम करण्यासाठी काय करावे?


क्लेम मिळवण्यासाठी सर्वात आधी क्लेम फॉर्म भरणे गरजेचे आहे. 
मृत्यू दाखल्याची मूळप्रत किंवा प्रमाणित प्रत लागेल. 
FIR च्या मूळ किंवा प्रमाणित प्रत सोबत जोडा
पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि FSL रिपोर्ट सोबत जोडा
आधारकार्ड छायांकित प्रत
RuPay कार्डधारक असल्याचे शपथपत्र
नॉमिनीचे नाव आणि बँक डिटेल, पासबुकची छायांकित प्रत,आदी  कागदपत्र बँकेत जमा करावीत


महत्वाचे कागदपत्र


1 विमा क्लेम फॉर्म
2 मृत्यू प्रमाणपत्राची एक  प्रत
3 कार्डधारक आणि नॉमिनीचे व्यक्तीची आधार प्रत
4 FIR मूळ प्रत किंवा प्रमाणित प्रत
5 कार्ड जारी करणाऱ्या बँकेचे घोषणापत्र
7 बँक अधिकाऱ्याचे नाव आणि ईमेल आयडी संपर्काचे विवरण