Big News : कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाला विळखा घातल्यानंतर मानवी जीवनशैलीसोबतच बऱ्याच महत्त्चाच्या गोष्टीही अतिशय झपाट्यानं बदलल्या. संपूर्ण जगात टाळेबंदीची वेळ ओढावली. शिक्षणासाठी बाहेर निघण्यावरही नियमावली आल्या. स्मार्ट एज्युकेशन अर्थात ऑनलाईन शिक्षणपद्धतीला यादरम्यान वाव मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोरोनाच्या (Corona wave) या लाटेचा मोठा परिणाम झाला. पण, आता मात्र त्यांच्या वाटेतल्या अडचणी दूर होणार असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, कोरोना नियमांमुळे अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी चीनकडून अखेर दोन वर्षांनंतर व्हिसा जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Big news for stuents china to issue visa after teo years post corona pendamic )


( Indian Students) भारतीय विद्यार्थ्यांसमवेत इतरही विविध श्रेणींसाठी व्हिसा जारी करण्याची घोषणा चीनकडून करण्यात आली आहे. सदर घोषणेनुसार एक्स1 व्हिसा त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे जे उच्च शिक्षणासाठी प्रदीर्घ काळापासून चीनमध्ये जाऊ इच्छितात. यामध्ये जे विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी पुन्हा चीनमध्ये येऊ इच्छितात त्यांचाही समावेश आहे. 


दर महिन्याला मिळणार 19 हजारांचा बोनस, कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना दिलं मोठं सरप्राईज


 


(Covid Visa) कोविड व्हिसा नियमांमुळं जवळपास 23 हजारहून अधिक विद्यार्थी भारतात परतले होते. यामध्ये (medical education) वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. चीनकडून देशात शिक्षणासाठी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली होती. यामध्ये भारताकडून कैक विद्यार्थ्यांची नावं पुढे देण्यात आली होती. 


दरम्यान, सध्या श्रीलंका, पाकिस्तान, रशिया आणि इतरही काही देशातील विद्यार्थी गेल्या काही आठवड्यांमध्ये चार्टर्ड विमानानं  चीनमध्ये आले आहेत.