Post Office News: पोस्ट ऑफिसच्या नव्या धोरणानुसार ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसने आपल्या नियमात बदल केलाय. याचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. आता पोस्ट ऑफिसने पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. पोस्ट ऑफिसच्या नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती पोस्ट ऑफिसने दिलेय.


या ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) आधार सक्षम पेमेंट सिस्टमवरुन (AePS) व्यवहार करताना काही नियम केला आहे. या नव्या नियमानुसार शुल्कात बदल करण्यात आला आहे. पोस्ट कार्यालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, जे IPPB चे ग्राहक नाहीत त्यांना एकापेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आधारद्वारे पैसे काढणे, जमा करणे किंवा मिनी स्टेटमेंट तयार करणे देखील समाविष्ट आहे. त्यामुळे आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.


मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास...


पोस्ट ऑफिसने (Post Office) जारी केलेल्या निवेदनानुसार, एका महिन्यात मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाले आणि पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये + GST ​​शुल्क भरावे लागेल. इतकेच नाही तर मिनी स्टेटमेंटसाठी प्रति व्यवहार 5 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांत नाराजी आहे.


 जाणून घ्या NPCI काय म्हणते? 


NPCI च्या मते, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्स वापरुन फायदे मिळवण्यासाठी AePS वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. AePS एखाद्या व्यक्तीच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक, आयरिस माहितीवर कार्य करते, अशा प्रकारे फसवणुकीचे धोके दूर करते. अशा प्रकारे, AePS ग्राहकांना अधिक सुरक्षा देत आहे.