UPI Payment | UPI युजर्ससाठी मोठी बातमी; पेमेंट फेल झाल्यास तातडीने मिळणार दिलासा
तुम्हीही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पेमेंट अयशस्वी झाले किंवा UPI अंतर्गत अडकले तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : तुम्हीही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पेमेंट अयशस्वी झाले किंवा UPI अंतर्गत अडकले तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
UPI Payment Rules: तुम्ही देखील UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा सर्वात जास्त वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड आहे. परंतु काहीवेळा UPI वापरकर्ते पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे नाराज होतात. पण आता अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करत आहे. यानंतर यूजर्सची या समस्येपासून सुटका होईल.
रिझोल्यूशन सिस्टीम कधी कार्यान्वित होणार?
हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, 'एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे यांनी सांगितले की ही प्रणाली सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित होईल. अॅपमधील वैशिष्ट्यासह सुमारे 80-90 टक्के पेमेंट फेल रिअल टाइममध्ये सोडवले जाण्याची अपेक्षा आहे.