IRCTC : रेल्वेनं लांब पल्ल्यांचा प्रवास सातत्यानं करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात, किंवा कोणा एका ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही सतत रेल्वेलाच पसंती देता तर ही बातमी तुमच्यासाठी. बातमी महत्त्वाची यासाठी, कारण आयआरसीटी (IRCTC)नं अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. (big news Indian Railways Changed Ticket Booking Rules)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर नियमांअंतर्गत आता तिकीटाचं आरक्षण करतेवेळी तुम्हाला अकाऊंट वेरिफाय करावं लागणार आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीचं वेरिफिकेशन करावं लागणार आहे. 


नियम का बदलला? 
आयआरसीटीसीचे असे अनेक युजर्स आहेत ज्यांनी कोरोना महामारीच्या काळापासून ते आतापर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेली नाही. त्या सर्वांसाठीच हा नियम लागू करण्यात आला आहे. जर तुम्ही दीर्घकाळासाठी तिकीटाची बुकिंग केली नसेल, तर सर्वप्रथम वेरिफिकेशनची पायरी तुम्हाला ओलांडावी लागणार आहे. 


काय आहे प्रक्रिया? (मोबाईल /ईमेल वेरिफिकेशन)


- IRCTC च्या अॅप किंवा वेबसाईटवर जा तिथं वेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा. 
- इथं तुमचा वारपरात असणारा आणि या अकाऊंटला जो़लेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी द्या. 
- दोन्ही माहिती दिल्यानंतर वेरिफाय या बटणावर क्लिक करा. 
- वेरिफायवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो इथं एंटर करुन मोबाईल क्रमांक वेरिफाय करा. 
- अशाच पद्धतीनं ईमेल आयडीवरही एक कोड येईल. हा कोड टाईप केल्यानंतर तुमचा ईमेलही वेरिफाय होईल. 
- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला रेल्वेची तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहे. 


आणखी एक आनंदाची बातमी 


रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, आयआरसीटीसीच्या एका युजर आयचीवरून आता महिन्याला 12 नव्हे 24 तिकीट बुक करता येणार आहेत. ज्या अकाऊंटशी आधार लिंक नाही, अशा अकाऊंटवरूनही 6 ऐवजी 12 तिकीटं बुक करता येणार आहेत.