पाटणा: बिहार Bihar विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती आल्यानंतर येथे सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग धरला. सर्वात मोठा पक्ष म्हणून एनडीएनं इथं मुसंडी मारली. ज्यानंतर रविवारी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत NDA सरकारची जबाबदारी खुद्द nitish kumar नितीश कुमार घेणार असल्याची घोषणा करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशील मोदी यांचं उपमुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं.... 


नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सज्ज असले तरीही आतापर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर असणारे सुशील मोदी यापुढं ही जबाबदारी सांभाळणार नाहीत. भाजपनं तारकिशोर प्रसाद यांना पक्षाचा विधीमंडळ नेतेपदी आणि रेणू बाला यांना उपनेतेपदी नियुक्त केलं आहे. दिल्लीहून पाटण्याला आलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत्या घोषणेवर शिक्कामोर्तब केलं. 


दरम्यान, यापूर्वी पाटण्यामध्ये नितीश कुमार यांना सर्वानुमते जेडीयूकडून विधीमंडळ नेतेपदी नियुक्त करण्यात आलं.


सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ 


- २००० या वर्षी नितीश कुमार पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. पण, बहुमताअभावी त्यांना अवघ्या सातव्याच दिवशी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  


- २००५ मध्ये भाजपशी युती करत निवडणूक लढवत त्यांनी पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन केलं. 


- तिसऱ्या वेळेस २०१० मध्ये जनतेनं पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत सत्ता त्यांच्याच हाती दिली. 


- २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करता येऊ न शकल्यामुळं नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा देत जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं. पण, दोन नेत्यांमधील मतभेदांमुळं मांझी यांना राजीनामा द्यावा लागला. 
- २२ फेब्रुवारी २०१५ मध्ये नितीश कुमार चौंथ्यांदा मुख्यमंत्री पदी आले. 


- भाजपशी वेगळं झाल्यानंतर कुमार यांनी आरजेडीशी युती केली. परिणामी निवडणूक जिंकत ते पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी आले. 


 


- आरजेडीची साथ सोडत २७ जुलै २०१७ मध्ये भाजपच्या साथीनं त्यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


- आता, २०२० मध्ये निवडणुकीत बाजी मारत ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी येत आहेत. राजकीय वर्तुळात हा एक विक्रमच ठरत आहे. त्यामुळं आता सर्वांचीच नजर नितीश कुमार यांच्या नव्या कारकिर्दीवर असणार आहे.