Big News : दोन हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI  अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.  30 सप्टेंबरपर्यंतच  2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत.  बाजारातील सध्याच्या नोटा वैध असणार आहेत असे देखील रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. अप्रत्यक्षपणे 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 


सात वर्षांपूर्वी झाली होती नोटबंदी


सात वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटबंदी केली होती.  8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनात असलेल्या 500 आणि 1 हजारच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. नोटबंदीला विरोध करणा-या 58 याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आल्या होत्या. नोटबंदी कायदेशीर, पण ध्येय गाठण्यात सरकार अपयशी ठरल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं या याचिकांवरील सुनावणी दरम्यान दिला होता. नोटबंदीची प्रक्रिया बदलता येणार नाही असंही खंडपीठानं सांगितले होते.