देशाचे रक्षकच निशाण्यावर; श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला
दोन जवान शहीद
श्रीनगर : देशाच्या सीमा भागात सुरक्षा रक्षक terrorist attack दहशतवादी आणि घुसखोरांवर करडी नजर ठेवून असतानाच आता देश संरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या जवानांवर निशाणा साधण्यात येत आहे. एकीकडे मुंबईतील भ्याड दहशवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होत असतानाच याच दिवशी देशात आणखी एक दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे.
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केल्याचं कळत आहे. jammu kashmir जम्मू काश्मीरमधील srinagar श्रीनगरमध्ये असणाऱ्या एचएमटी भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. सदर घटनेनंतर ताबडतोब या परिसरात ये- जा करणाऱ्या मार्गांना बंद करण्यात आलं असून, उत्तरार्थ कारवाई करण्यात येत आहे.
राणा मंडोल आणि जियाउल हक अशी शहीद झालेल्या जवानांची नावं असल्याची माहिती समोर येत आहे. आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनेचे जवान दैनंदिन गस्तीवर असतानाच तीन दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी तेथे गोळीबार सुरु केला.
प्राथमिक अंदाज वर्तवता हा जैशचा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. हल्लेखोर दहशतवादी हे एका कारमधून आले होते, ज्यामध्ये 2 पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवादी असल्याचं म्हटलं जात आहे.