नवी दिल्ली : सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोलच्या किंमती यामुळे वैतागलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मोबिक्विक सारख्या ई पेमेंट साईट्स वर कॅशबॅक ऑफरसोबत सुपरकॅश देखील मिळत आहे. ही ऑफर ७ जानेवारी २०१८ पर्यंत असेल.


काय आहे ही ऑफर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलचे पेमेंट केल्यावर ५% पर्यंत सुपरकॅशचा फायदा तुम्हाला मिळेल. सुपरकॅश ५० रुपयांपेक्षा अधिक नसेल. तुम्ही प्रत्येक आठवड्याला सुपरकॅशचा फायदा घेऊ शकता. याशिवाय ०.७५% कॅशबॅक देखील मिळेल. म्हणजे जर तुम्ही १०० रूपयांचे पेट्रोल टाकले तर हे पेट्रोल तुम्हाला ९४.२५ रूपयांना पडेल. यात तुम्हाला ५ रुपये सुपरकॅश आणि ०.७५ पैसे कॅशबॅक म्हणून मिळतील. सुपरकॅश तुम्ही पुढील ट्रांझाक्शनमध्ये वापरू शकता.


कसा मिळेल फायदा ?


ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कूपन कोडची गरज नाही. फक्त पेट्रोल पंपवर पेमेंट करताना क्यूआर (QR)कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला किती किंमतीचे पेट्रोल टाकले ती अमाऊंट इंटर करावी लागेल. त्यानंतर तुमच्या वॉलेटमध्ये अधिक ५० रुपये सुपरकॅशच्या स्वरुपात येतील. या सुपरकॅशचा उपयोग तुम्ही दूसऱ्या वेळेस पेट्रोल टाकतना होईल. यासाठी तुम्हाला कमीत कमी २०० रूपयांचे पेट्रोल टाकावे लागेल.


काही ठराविक पेट्रोल पंपावर मिळेल ही सुविधा


मोबिक्विकने पेमेंट करण्याची सुविधा आणि त्यातून मिळणारी सुपरकॅशची सुविधा काही ठराविक पेट्रोल पंपावर उपलब्ध होईल. याची लिस्ट कंपनीने वॉलेट ऑफरसहीत जाहीर केली आहे.


सुपरकॅशसोबत कॅशबॅकही


पेट्रोल डाकल्यावर तुम्हाला वॉलेटमध्ये सुपरकॅश मिळेल. त्याचबरोबर ०.७५% इतकी ऑनलाईन पेमेंटवर सूट मिळेल. तर सुपरकॅशसाठी तुम्हाला २४ तास वाट पहावी लागेल. त्यानंतर आपोआप ते  मोबिक्विक वॉलेट मध्ये येतील.


सुपरकॅशसाठी लिमीट नाही


या स्पेशल ऑफरशिवाय पेट्रोल-डिझेलसाठी मोबिक्विक वॉलेटमधून पेमेंट करणाऱ्यांसाठी ५% सुपरकॅश मिळेल. मात्र यासाठी तुम्हाला २०० रुपये खर्च करावे लागणार नाहीत. फक्त ५० रुपयांचे पेट्रोल टाकल्यावर हा फायदा मिळेल.