मुंबई : आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. आज दुपारीच शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय. 


 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या आमदारांसह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झालेत. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


गुवाहाटीकडे रवाना होताना सुरत विमानतळावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही."


एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही"